Pune Lonavala Local Train : ‘या’ तारखेपासून पुणे – लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत धावणार लोकल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Lonavala Local Train : लोणावळा ते पुणे या मार्गावर आता दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 पासून दुपारच्या वेळेत सोयीनुसार ही लोकल धावणार आहे. या मार्गावर दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने केली होती आता अखेर या मागणीला यश आलं असून लोणावळा ते पुणे दरम्यान दुपारच्या वेळेत 15 तारखेपासून सोयीनुसार लोकल धावणार आहे. याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाने खासदार श्रीरंग बारणे यांना दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, लोणावळा ते पुणे दरम्यान सोमवारपासून लोकल (Pune Lonavala Local Train) सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे. दुपारच्या वेळेत लोकल सुरू होणे हे सर्वांचं यश आहे.

कोरोनामुळे बंद झाली होती सेवा – Pune Lonavala Local Train

दरम्यान कोरोना काळाच्या पूर्वी पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे (Pune Lonavala Local Train) संचलन व्यवस्थित होत होते. त्यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होत नव्हती. मात्र करोना साथीच्या कालावधीनंतर रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोना नंतर आता देशात पूर्वी प्रमाणे सर्व काही रेल्वे सुरू झाल्या आहेत कोरोना साथीच्या अगोदर पुणे लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचलन बंद होते. साडेदहा ते अडीच या वेळेत लोकल सेवा बंद होत्या. दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी बारणे यांनी केली होती. त्यांची मागणी आता पूर्ण झाली असून 15 तारखेपासून दुपारच्या वेळेत लोणावळा ते पुणे दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल धावणार आहे.