कोल्हापुरात मटण दराचा संघर्ष तीव्र होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मटण दरावरून सुरू झालेला संघर्ष आता आणखीनच तीव्र होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीमध्ये मटण विक्रेते सहभागी होणार नसल्याने हा पेच वाढणार आहे. त्यामुळे नक्की कोणत्या दराने मटन खरेदी करायचं हा प्रश्न  अनुत्तरित आहे.

गेल्या काही दिवसांपासून मटण दरवाढीवरून अनेक तक्रारी येत  आहेत. पण मटणाची दरवाढीमागे व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आमच्या काही अडचणी असल्याचे अजब उत्तर खाटीक समाज संघटनेचे विजय कांबळे यांनी दिला. गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूरात ५६० रुपये प्रतिकिलो असलेल्या मटणाच्या दरात २० रुपये कमी करत असून ५४० हा आमचा अंतिम दर असणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कोल्हापूरपासून ४ किलोमीटरवर असणाऱ्या गावांमध्ये जर ४४० रुपये किलो मटण विक्री होत असेल तर कोल्हापूरात सव्वाशे रुपयांचा फरक का ? असे विचारले असता आमच्या मटणाचा दर्जा आणि इतर ठिकाणचा दर्जा यात फरक असल्याचेही कांबळे यांनी सांगितलं.

Leave a Comment