Mutual Funds And Shares Investment | आज-काल अनेक लोक म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत असतो. परंतु जर तुम्ही देखील म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल. तर आता ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता बाजार नियमक सेबीने म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स (Mutual Funds And Shares Investment) संबंधित एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे.
ती म्हणजे आता गुंतवणूकदारांसाठी सेबी काही नियम केलेले आहेत. त्याचप्रमाणे नॉमिनेशन ऑप्शन न दिल्यास आता डिमॅट आणि म्युच्युअल फंड अकाउंट गोठवली जाणार नाहीत. सेबीने घेतलेला हा निर्णय बदल 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जा गुंतवणूकदारांनी नॉमिनेशन ऑप्शन दिलेला नाही. त्यांनी म्युच्युअल फंड अकाउंट गोठवण्याचा नियम सेबीने रद्द केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स ठेवणारे गुंतवणूक दारात लाभांश व्याज किंवा सिक्युरिटीचे इनकॅशमेंट सारखे पेमेंट देण्यास पात्र असणार आहेत.
याआधी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने सर्व विद्यमान म्युच्युअल फंड धारकांना नॉमिनी तपशील सादर करण्यासाठी किंवा नॉमिनेशन मधून बाहेर पडण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत दिलेली होती. ज्या लोकांनी या नियमाचे पालन केले नाही. त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर बंदी देखील घालण्यात येणार होती. परंतु आता सेबीने याबाबतचा परिपत्रक जाहीर केलेला आहे.
या पत्रकानुसार (Mutual Funds And Shares Investment) आता नॉमिनेशन ऑपशन न दिल्यामुळे डिमॅट आणि खात्यांबद्दल म्युच्युअल फंड खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील म्हटलेले आहे. परंतु आता लेटेस्ट कंपन्या आणि आरटीएने नॉमिनेशन सादर न केल्यामुळे रखडलेली ध्येय वैद्यकीय निकाली काढली जातील असे देखील म्हटलेले आहे. परंतु आता नवे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड युनिट्स धारकांना डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंड धारकांना फंडफोलिओसाठी नॉमिनी देणे अनिवार्य असल्याचे देखील सांगितलेले आहे