“माझी निवडणुक माझा उमेदवार” चा नारा देत राजेश विटेकरांसाठी लोकवर्गणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस बार वोट भी देंगे और नोट भी देंगे चा नारा…राजू शेट्टींची स्ट्रॅटेजी ; कासापुरी ग्रामस्थांचा पुढाकार

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांनी लोकवर्गणीतून निवडणुकीसाठी निधी जमवणं सुरु केली आहे. गेली ३० वर्षे परभणीत शिवसेनेचाच खासदार निवडून येत असल्याने यंदा उमेदवार बदला,पक्ष बदला, जिल्हाही बदलेल अशी घोषणा देत राजेश दादांनी आपल्या प्रचाराची राळ उडवून दिली आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी मदतीचे आवाहन करणाऱ्या पेट्या ठेवण्यात आल्या असून लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधत राजेश विटेकरांनी आपली प्रचार मोहीम धडाक्यात सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले मतदार संघात असाच निधी विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनीही गोळा केला होता.

या मोहिमेला जनतेतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कासापुरी ग्रामस्थांनी यावेळी “इस बार हम वोट भी देंगे, और नोट भी देंगे” असा सूचक इशारा प्रतिस्पर्ध्यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विविध विकासकामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहचवलं असल्याने राजेश विटेकर शिवसेनेच्या उमेदवाराला तुल्यबळ लढत देतील असं एकूण चित्र दिसत आहे

Leave a Comment