कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
माझी वसुंधरा अभियान या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यात कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेचा 3 रा क्रमांक आला आहे. स्वच्छ पाण्याचा डंका देशभर असणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेच्या आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे. माझी वसुंधरा अभियानात मिळालेल्या यशामुळे मलकापूर शहरातील नागरिकांनी तसेच पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला.
नगरपरिषदेने सर्वोत्तम कामगिरी गेल्याने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या ऑनलाईन कार्यक्रमास मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, नगरपरिषदेचे नगरसेवक / नगरसेविका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगपरिषदेचेवतीने नोडल अधिकारी म्हणून सौ. मनिषा फडतरे, शहर समन्वयक श्री. पुंडलिक ढगे. जनसंपर्क अधिकार श्री.ज्ञानदेव साळुंखे, कार्यालय निरीक्षक श्री. राजेश काळे. नगर अभियंता श्री. शशिकांत पवार, सहा नगररचनाकार प्रियांका धनवडे, विद्युत अभियंता सौ. धन्वंतरी साळुंखे, आरोग्य अभियंता सौ. प्रियांका तारळेकर, सहा. अभियंता श्री राहुल अडसूळ, कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक श्री. आत्माराम मोहिते व श्रीकांत शिंदे, व्यवसाय कर विभाग प्रमुख श्री. रमेश बागल यांनी काम पाहिले आहे.
सदर स्पर्धेत मलकापूर नगरपरिषदेने राज्यात सर्वोत्तम कामगिरी करून तिसऱ्या क्रमांक मिळविल्या बद्धल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नगरविकास विभाग मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, गृह राज्यमंत्री (शहरी) सतेज उर्फ बंटी पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, सहकार व कृषि राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य विश्वजित कदम, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांनी मलकापूर नगरपरिषदेचे अभिनंदन केले आहे.