हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील (वय 93) यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.
ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील (वय 93) यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वातावरणातील बदलामुळे तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
यापूर्वी उपचारादरम्यान प्रा. एन. डी .पाटील यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नाही. दरम्यान आज त्यांची प्रकृति अधिकच खालावली. तसेच नुकतीच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रा. एन. डी. पाटील यांचा जीवनप्रवास –
संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : 15 जुलै 1929 – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,1955; एल.एल.बी.( 1962 ) पुणे विद्यापीठ
अध्यापन कार्य
1954- 1957 छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर.
1960 साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य.
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य 1962
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य 1965
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य 1962-1978
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन 1976-1978
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य 1991
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- 1959 पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – 1990 पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – 1985 पासून
राजकीय कार्य
1948 – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
1957 – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
1960-66,1970-76,1976-82 अशी 18 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
1969- 1978, 1985 – 2010 – शे.का.प.चे सरचिटणीस
1978-1980 – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
1985-1990- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
1999-2002 – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
मिळालेले सन्मान / पुरस्कार
भाई माधवराव बागल पुरस्कार – 1994
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, 1999
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – 1998 – 2000
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, 2000
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- 2001
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार