हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून त्यातच आता दक्षिण कोरियात (South Korea) तर चक्क मेंदू खाणाऱ्या विषाणूची एंट्री झाली आहे. नेग्लेरिया फॉलेरी (Naegleria Fowleri) असं या विषाणूचे नाव असून हा विषाणू मानवी मेंदूच्या पेशींवर हल्ला करून त्या नष्ट करतो. याच्या संक्रमणाने एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.
कुठे आढळतो हा विषाणू-
नेग्लेरिया अमिबा इतका लहान आहे की तो केवळ माइक्रोस्कोप (Microscope) च्या माध्यमातूनच दिसू शकतो. मेंदूला आघात करणारा हा अमिबा तुमच्या आजूबाजूला कुठेही असू शकतो. विशेषतः पाण्यात तसेच स्विमिंग पूल किंवा नदी, तलाव, डबके यांच्यामध्येही हा विषाणू आढळतो.
काय आहेत लक्षणे – (Naegleria Fowleri)
जेव्हा एखाद्या व्यक्तीला Naegleria fowleri ची लागण होते तेव्हा सुरुवातीला डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे (Symptoms) दिसतात. अर्थात हा दुर्मिळ संसर्ग आहे. परंतु यामध्ये मृत्यूची शक्यता तब्बल 97% आहे. तरीही त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणजे या मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. हा अमिबा तुमच्या शरीरामध्ये गेल्यावरच या आजाराची लागण होते.