कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथे श्री सिद्धनाथ यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत व गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत मोठ्या उत्साहात पार पडली. श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत भक्तांनी व भाविकांनी गुलालाची उधळण केली
गेल्या शेकडो वर्षापासूनची असलेली अखंड पालखीची परंपरा यावर्षी देखील मोठ्या भक्ती भावाने भाविकांनी व ग्रामस्थांनी जोपासली आहे. श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी व जालना या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नाथपंथी डवरी समाज या यात्रेसाठी उपस्थित असतो.
नागझरी येथील श्री सिध्दनाथ देवाच्या यात्रेला कोरेगाव तालुक्यातील भाविकांसह परजिल्ह्यातूनही भाविक उपस्थित होते. ग्रामपंचायत प्रशासन तसेच तालुका प्रशासनाने आपली यंत्रणा अलर्ट ठेवली होती. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने अत्यंत शांततेत ही यात्रा पार पडली.