नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरची कन्या ट्रायथलिट संजना जोशी (Sanjana Joshi) ही लंडनमधील बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. ही 22 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट यादरम्यान पार पडणार आहे. भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनने 17 वर्षीय संजना जोशी (Sanjana Joshi) हिची तिच्या प्रभावी कामगिरीच्या आधारे आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

नागपुरातील पहिलीच महिला खेळाडू
संजना जोशी (Sanjana Joshi) हि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झालेली नागपुरातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिची स्प्रिंट अंतर ट्रायथलॉनसाठी निवड झाली आहे. ट्रायथलॉन ही एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे ज्यामध्ये खेळाडूंना पोहणे, नंतर सायकल चालवणे आणि नंतर शक्य तितक्या वेगाने मागे-पुढे धावणे आवश्यक असते. स्प्रिंट अंतर ट्रायथलॉनमधील शर्यतीचे अंतर 750 मीटर पोहणे, 20 किमी सायकलिंग आणि 5 किमी धावणे असे असते.

‘या’ठिकाणी घेत आहे संजना प्रशिक्षण
संजना (Sanjana Joshi) ही डॉ. अमित समर्थ यांच्या अंतर्गत माइल्स एन मिलर्स एन्ड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तसेच ती संजना ही सोमलवार निकलस स्कूल, नागपूरची विद्यार्थिनी आहे. भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनकडून गेल्या महिन्यात चेन्नई येथे आयोजित केलेल्या निवड आणि मूल्यमापन शिबिरात तिने सहभाग घेतला होता.

हे पण वाचा

एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Leave a Comment