हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur Pune Vande Bharat Express । नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून येत्या १० ऑगस्ट पासून नागपूर- पुणे मार्गावरून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. हि ट्रेन आठवड्यातून ३ वेळा धावेल. तिचा सुरुवातीचा स्टॉप अजनी रेल्वे स्थानक असेल आणि शेवटचा थांबा पुण्यातील हडपसर स्टेशन असेल. या नव्या वंदे भारत एक्सप्रेस मुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी वाढण्यास मदत होईल. तसेच व्यापार आणि पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल.
कस असेल वेळापत्रक ? Nagpur Pune Vande Bharat Express
पुणे रेल्वे स्थानकात सध्या अधिक गाड्या सामावून घेणे शक्य नसल्याने नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी (Nagpur Pune Vande Bharat Express) हडपसरला तात्पुरते टर्मिनस बनवलं आहे. ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ९:५० वाजता अजनीहून निघेल आणि त्याच रात्री ९:५० वाजता पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) पुण्याहून सकाळी ६:२५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस धावेल… दर सोमवारी अजनीहून आणि मंगळवारी पुण्याहून…..
यापूर्वी पुण्याहून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला ये जा करण्यासाठी तब्बल १३-१४ तास लागायचे. मात्र आता वंदे भारत ट्रेनमुळे (Nagpur Pune Vande Bharat Express) हाच प्रवास १२ तासांवर आला आहे. म्हणजेच प्रवाशांचा वेळ २ तासांनी वाचणार आहे. सुरुवातीला हि स्लिपर ट्रेन नसेल, त्यामुळे प्रवाशांना बसून प्रवास करावा लागेल. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांना वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड या रेल्वे स्थानकावर थांबेल. त्यामुळे इथल्या प्रवाशाना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्या स्थानकावर किती वाजता थांबणार ?
अजनी – सकाळी ९.५० वाजता
वर्धा – सकाळी १०.४० वा.
बडनेरा – दुपारी १२.०३ वा.
अकोला – दुपारी १ वाजता
भुसावळ – दुपारी २.५५ वा.
जळगाव – सायंकाळी – ३.२६ वा.
मनमाड – सायंकाळी ५.२५ वा.
कोपरगाव – ६.२० वा.
अहमदनगर – रात्री ७.३५ वा.
दौंड – रात्री ८.४३ वा.
पुणे – रात्री ९.५०