हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंसक असे वातावरण आहे. आरक्षणावरून बांगलादेशमध्ये खूप मोठा वाद पेटला. आणि त्यातून काही जीवितहानी देखील घडलेली आहे. या सगळ्या परिस्थितीत नंतर बांगलादेश मधील पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्या देश सोडून देखील गेलेल्या आहेत. सध्या शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर देशामध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली एक काळजीवाहू सरकार. संपूर्ण देशाचा कारभार पाहत आहे. बांगलादेशमध्ये सत्तांतरामुळे जे आंदोलन झाले. त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एका नेत्यांनी नाहीद इस्लाम याने भारताला देखील इशारा दिलेला आहे. त्याबे असे म्हटलेले आहे की, भारत सरकारने बांगलादेशमधील कोणत्याही एका पक्षाला पाठिंबा देणे हे दोन्ही देशांमध्ये कतुटेमागचे एक मोठं कारण असणार आहे. सध्या बांगलादेश मध्ये हा काळजीवाहू सरकार देश चालवत आहे. त्यातील एक माहिती आणि प्रसारक सल्लागार आहे.
बांगलादेश मधील काळजीवाहू सरकारचे मुख्य मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधलेला आहे. या संवादनंतर त्याने भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधाबाबत देखील वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की भारताचे आमचे आधीपासूनच ऐतिहासिक संबंध आहे. परंतु यात नेहमीच चढउतार येत असतात. हे संबंध दोन देशांमधील आणि दोन लोकांमधील देखील आहे. तसेच भारताचे संबंध हे बांगलादेश मधील एका राजकीय पक्षासोबत आहे. बांगलादेशमधील लोकांसोबत नाही, असे आम्हाला वाटू लागले आहे. कारण भारताने सध्या बांगलादेशसोबत संबंध प्रस्थापित न करता आवामी लीग पक्षासोबत संबंध प्रस्थापित केले आहे. त्यामुळे ही बाब आता भारतासाठी ही समस्या वाढवणारी असणार आहे.
भारत सरकारने आवामी लीग पक्षासोबत संबंध प्रस्थापित केले. आणि त्यांना पाठिंबा दर्शवल्यामुळे मोहम्मद युनूस यांना हे पटलेले नाही. त्यानंतर त्यांनी हे विधान केलेले आह याबाबत त्यांनी भारताला सल्ला देखील दिलेला आहे. यावेळी तो म्हणाला की, कुठल्याही एका पक्षासोबत नाही तर देश आणि त्या देशातील लोकांसोबत संबंध प्रस्थापित करणे आणि ते टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. ही गोष्ट भारताने देखील समजून घेतली पाहिजे. राजकीय पक्ष येतात जातात. परंतु देश आणि देशासोबत तसेच लोकांसोबतचे संबंध देखील चांगले ठेवले पाहिजे. त्यामुळे येथील लोकांच्या मनात भारतासंदर्भात राग आणि संताप निर्माण झाला आहे. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.