सातारा जिल्ह्यातील 12 आदर्श शिक्षक पुरस्कारांची नावे जाहीर

Satara ZP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्हा परिषदेचे सन 2022-23 सालचे जिल्ह्यातील 12 प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार जाहीर केले आहेत. लवकरच या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती स्तरावरुन सन 2022-23 सालच्या शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नांवे पुढीलप्रमाणे ः- जि. प. शाळा कुडाळ (ता. जावली) येथील संदीप आत्माराम किर्वे, जि. प. शाळा उंब्रज (ता. कराड) (मुली) येथील मनिषा शंकर रामुगडे, जि. प. शाळा शिरवळ (ता. खंडाळा) येथील नूरजहाँ लियाकत काझी, जि. प. शाळा विसापूर (ता. खटाव) येथील ज्ञानेश्वर श्रीरंग धायगुडे, जि. प. शाळा बिचुकले (ता. कोरेगाव) येथील चंद्रकांत दगडू चव्हाण, जि. प. शाळा खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील संजय राजाराम कांबळे, जि. प. शाळा माणगंगानगर (ता. माण) येथील विलास खरात, जि. प. शाळा दुसाळ (ता. पाटण) येथील रमेश एकनाथ जाधव, जि. प. शाळा नाईकबोमवाडी (ता. फलटण) येथील सुलभा तानाजी सस्ते, जि. प. शाळा खेड (ता. सातारा) येथील बाळकृष्ण वसंतराव जगताप, जि. प. शाळा अभेपुरी (ता. वाई) येथील रवि भगवान ओव्हाळ, जि. प. शाळा आवर्डे (ता. पाटण) (विशेष पुरस्कार) येथील राजेंद्र पांडुरंग वाकडे यांना जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातून विविध शाळांतून प्राप्त प्रस्तावामधून प्रत्येक तालुक्यातून 1 अशा 11 शिक्षकांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तर एका शिक्षकाची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेली आहे.