Namo Shetkari Mahasanman Yojana | शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता; 2021 कोटी रुपये मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Namo Shetkari Mahasanman Yojana | राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने भारतातील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. ज्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आणि त्यांना आर्थिक मदत देखील मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये दिले जातात.

अशातच आता राज्य सरकारने देखील 2023 रोजी शेतकऱ्यांसाठी अशीच एक नमो शेतकरी महा सन्मान योजना(Namo Shetkari Mahasanman Yojana ) सुरू केली. या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे तीन हफ्ते म्हणजे 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे. आणि आता या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि या योजनेसाठी राज्य सरकारने जवळपास 2041 कोटी रुपये मंजूर देखील गेलेले आहेत.

राज्य सरकारने याआधी नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी 5521 कोटी रुपये वितरित केलेले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये या योजनेसाठी शेतकऱ्यांना एखादा 720 कोटी रुपये वितरित केले आहे. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत 1782 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. तसेच डिसेंबर ते मार्च या कालावधीत 2 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केलेले आहे. म्हणजे या योजनेचे तीन हप्ते आता गेलेले आहेत. आणि आता चौथा हप्ता देखील मंजूर झालेला आहे. या चौथ्या हप्त्यासाठी आता 2021 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झालेला आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता | Namo Shetkari Mahasanman Yojana

मागील वर्षी राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजना (Namo Shetkari Mahasanman Yojana ) चालू केली. आणि आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत. आता चौथा हप्ता देखील लवकरच येणार आहे. याबद्दल शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच चौथ्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएम किसान या योजनेच्या धर्तीव रही योजना सुरू केलेली आहे. पीएम किसान या योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हप्ते जमा झालेले आहेत.

राज्यसभा निवडणुकीआधीच सरकारने याआधी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवले आहेत. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. आणि याचा नक्कीच त्यांना विधानसभा निवडणुकीला फायदा होणार आहे.