MeToo प्रकरणाचा निकाल समोर; नानांना धक्का की दिलासा?

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी चित्रपटातील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर नेहमीच त्यांच्या चित्रपटामुळे अन आवाजामुळे चर्चेत असतात. पण काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पण हा आरोप खोटा आहे हे सिद्ध होण्यासाठी 2025 पर्यंत त्यांना वाट पाहवी लागली आहे . अखेरी दंडाधिकारी कोर्टाने अभिनेत्री तनुश्री दत्ताची तक्रार खोटी आहे, असं सांगितले आहे. तसेच हे आरोप सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे या आरोप खोटा आहेत, हे सिद्ध झाले. त्यामुळे नाना पाटेकराना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोर्टाने नाना पाटेकर निर्दोष असल्याचे सांगितले –

अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2018 साली नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. नाना पाटेकर यांच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनुसार, कोणत्याही ठोस पुराव्यांअभावी कोर्टाने या प्रकरणातील तक्रार रद्द करण्याचा निर्णय घेतला. दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये हे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ते निर्दोष असल्याचे सांगितले आहे.

नाना पाटेकर काय म्हणाले –

नाना पाटेकर म्हणाले कि , “मला माहीत होतं की हे आरोप चुकीचे आहेत. म्हणून मला कधीच राग आला नाही,” असे नाना पाटेकर म्हणाले. “सगळे आरोप खोटे होते, तर मला राग का येईल? या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत . त्या घडून गेल्या आहेत. त्याबद्दल आता आपण काय बोलू शकतो?”

तनुश्रीने ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत 2018 मध्ये गंभीर आरोप –

अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2008 मध्ये नाना पाटेकर, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी, निर्माता राकेश सारंग आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधात एका डान्स चित्रीकरणादरम्यान लैंगिक छळ केला, असा आरोप केला होता. या चौघांविरोधात एफआयआर दाखल केले होते. याची तक्रार तनुश्रीने ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत 2018 मध्ये केली. ‘हॉर्न ओके प्लीज’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी माझा छळ केला होता. गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन करून स्पर्श केला होता असेही तिने म्हंटले होते.