नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एका 17 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून (drown in river) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू चव्हाण असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हि दुर्दैवी घटना हदगावच्या उंचाडा येथील कयादू नदीत (drown in river) घडली आहे. वाळू काढण्यासाठी लागणाऱ्या तराफ्यांवर कारवाई केली जाईल, या भीतीने राजू ते वाचवण्यासाठी नदीत उतरला होता. तराफे लपवण्यासाठी पोहत जात असताना राजूचा पाय अडकला आणि तो पाण्यात बुडाला (drown in river). या घटनेमुळे हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अवैध वाळू उपशाचा प्रश्न
पावसाने दोन दिवसांपासून नांदेडमध्ये काहीशी उसंत घेतली आहे. दरम्यान, कयादू नदीत वाळू (drown in river) उपसा केला जातो आहे, याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळली होती. फोनवरुन तहसील कार्यालयात याबाबत माहिती देण्यात आली होती. पावसाने काहीसा ब्रेक घेतल्यानं अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी हालचालही सुरु केलेली. दरम्यान, पथक जर कारवाई करण्यासाठी आलं, तर वाळू उपसा करण्यासाठी लागणारे तराफे जाळून नष्ट केले जातील, अशी भीती राजू ज्ञानेश्वर चव्हाण याला होती.
पोहताना पाय अडकला
तराफे वाचवण्यासाठी राजूने पाण्यात उतरून ते लपवून ठेवण्यासाठी दुसऱ्या बाजूला पोहत (drown in river) जाण्याचा प्रयत्न केला. पण पोहताना त्याचा पाय पाण्यात अडकला आणि त्याचा बुडून (drown in river) मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर राजू चव्हाण या तरुणाचा मृतदेह हदगाव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर