नांदेड प्रतिनिधी । कोरोना विषाणूने राज्यात सर्वत्रच थैमान घातले आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यापार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. १२ जुलै पासून २० जुलै पर्यंत जिल्ह्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधीन राहून आस्थापना व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. संचारबंदीचे १००% पालन होते कि नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, यावेळी सर्व शासकीय कार्यालये व त्यांचे कर्मचारी यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करणेत आले आहे. तसेच दवाखाने व मेडिकल स्टोअर्स ना संचारबंदीत सूट देण्यात आली आहे.