Nanded Pune Vande Bharat : मराठवाड्यासाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस; या 4 जिल्ह्यांतुन धावणार

Nanded Pune Vande Bharat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nanded Pune Vande Bharat । मागच्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात नवनवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येतोय. सध्या महाराष्ट्रात सुमारे १० वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. आता यात आणखी एका ट्रेनची भर पडणार आहे. हि नवी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून नांदेडसाठी धावेल. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिट्री आणखी वाढेल. नांदेड, लातूर आणि धाराशिव मार्गे पुणे असा तिचा रूट असेल.

कधीपासून सुरु होणार – Nanded Pune Vande Bharat

खरं तर नांदेड हुन पुण्याला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर तरुण येत असतात. पुणे हे नोकरीचे मोठे केंद्र असल्याने फक्त नांदेडच नव्हे तर लातूर, धाराशिव सह मराठवाड्यातील लोकांचा याठिकाणी मोठा वावर आहे. परंतु सध्याच्या स्थितीत नांदेडहुन पुण्याला ये जा करण्यासाठी एकही ट्रेन उपलब्ध नाही. यामुळे या भागातील हजारो विद्यार्थी आणि नोकरदारांना प्रवास करताना मोठ्या अडचणी निर्मांण होतात. याच पार्श्वभूमीवर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी (Nanded Pune Vande Bharat) सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नांदेड पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. येत्या डिसेंबर पासून हि ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येईल.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात खासदार रवींद्र चव्हाण यांनी म्हंटल की नांदेड, लातूर आणि धाराशिव मार्गे हाय-स्पीड ट्रेनमुळे (Nanded Pune Vande Bharat) या भागातील लाखो प्रवाशांना फायदा होईल. ५५० किमी लांबीची वंदे भारत एक्सप्रेस जलद आणि अधिक आरामदायी पर्याय देत प्रवासाचा वेळ खूप मोठ्या प्रमाणावर कमी करेल अशी अपेक्षा आहे. तसेच लातूर रोड आणि परळी वैजनाथ येथे लोको-मोटिव्ह बदलांमुळे होणाऱ्या विलंबामुळे ६४६ किमीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी १६ तासांपेक्षा जास्त वेळ लागणारा पनवेल-नांदेड एक्सप्रेस (१७६१३) बद्दलही चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की पनवेल-कुर्डूवाडी लेग (३०३ किमी) ६ तास २० मिनिटे घेते, तर कुर्डूवाडी-नांदेड लेग (३७० किमी) १० तास २० मिनिटे घेते. त्यामुळे हे टाळण्यासाठी लातूर रोड आणि परळी वैजनाथ स्टेशनवरील लाईन चौपट करावी अशी मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली. यामुळे इंजिन बदलण्याचा वेळ कमी होईल, दररोज १०-१२ गाड्यांचा फायदा होईल आणि भारतीय रेल्वेच्या खर्चात बचत होईल असं त्यांनी म्हंटल.