उद्धव ठाकरे पुळचट माणूस, बाळासाहेबांचं नाव घेण्याची लायकी नाही – नारायण राणेंची जहरी टीका

0
47
narayan rane uddhav thackrey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात बोलतांना नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्रांवर सडकून टीका केली होती.त्या टिकेलाच उत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खास पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी बोलतांना राणे म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे,काही कामाचा नाही हा माणूस, खरं तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायची याची लायकी नाही.अशी जहरी टीका नारायण राणेंनी केली.

उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे.आज बाळासाहेब ठाकरे असते तर या माणसाला साहेबांनी मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं.आणि हा काय बाता मारतो.मी जर माझं तोंड उघडलं तर मुख्यमंत्री पद तर सोड नुसता पळत फिरशील,अशा खालच्या शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच फैलावर घेतले.

मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून एकही काम यांनी नीट केलं नाही. यांना जीडीपी कळत नाही, अर्थव्यवस्था माहिती नाही. अधिकारी हसतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसला आहे. माझे सर्व शब्द त्यांना सांगा, असं राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषेसारखी परत जर भाषा वापरली तर आम्ही मातोश्रीची आतली आणि बाहेरची माहिती देऊ. ती त्यांना महागात पडेल. बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून अजून संयमाने गप्प बसलो आहे. आमच्याकडे नजर फिरवू नका. आम्ही नजर फिरवली तर कपडे सांभाळत पळता भुई थोडी होईल, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here