फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये; राणेंचा रामदास कदमांना थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुती मध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागा लढवण्यावरून महायुतीमध्येच आरोप – प्रत्यारोप होत आहेत. भाजपने मित्रपक्षांचा केसाने गळा कापू नये असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट इशारा दिला आहे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल असं म्हणत राणेंनी रामदास कदम यांच्यावर पलटवार केला आहे.

नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटल, आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल.

रामदास कदम काय म्हणाले होते-

कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघावर (Ratnagiri- Sindhudurg Constituency) भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्हीकडून दावा केला जात आहे. सध्या रत्नागिरी- सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत असून ते ठाकरे गटात आहेत. त्यामुळे या जागेवर भाजप नारायण राणे याना उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र हि जागा आमची हक्काची असून याठिकाणी आमचाच उमेदवार उभा राहणार असं रामदास कदम यांनी ठणकावलं होते.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत, त्याच लोकांचा केसाने गळा कापून नका . यामुळे भविष्यासाठी भाजपकडून वेगळा मेसेज जात आहे, याचा भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे.’ मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं माहित नाही, पण पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासाघात झाला तर, माझं नाव पण रामदार कदम आहे, हे मी आज सांगतोय, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपला थेट शिंगावर घेतलं आहे.