हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सध्या 25 समर्थक आमदारांसोबत ते गुजरात मध्ये आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून ठाकरे सरकारही धोक्यात येऊ शकते. या एकूण घडामोडींवर बोट ठेवत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक इशारा दिला आहे. पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा अस राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्य वर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने चांगली वागणूक दिली नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाबत हे अनेकदा घडलं आहे म्हणून त्यांनी बंड पुकारलं. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार राहिले नाही. एका तासाभरात महाराष्ट्रात काय घडत ते बघा, अस राणे म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही तोंडसुख घेतलं. संजय राऊत यांना कोण विचारतो? शिवसेना संजय राऊतांनी संपवली. संजय राऊत यांचा आवाज आज बसला आहे उद्या बंद होईल असा टोला राणेंनी लगावला.