रत्नागिरी- सिंधुदुर्गातून राणेंना संधी?? कोकणात रंगणार राजकीय शिमगा

Narayan Rane Lok Sabha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून लोकसभा (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha) लढवताना दिसू शकतात. महायुतीमध्ये हि जागा भाजप स्वतःकडे घेण्याची शक्यता असून असं झाल्यास नारायण राणे हेच भाजपकडून उमेदवार असतील. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हि जागा ठाकरे गटाकडे असून विद्यमान खासदार विनायक राऊत याना पुनः एकदा तिकीट देण्यात आलं आहे. नारायण राणे आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे कोकणात आता राजकीय शिमगा पाहायला मिळेल.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळतेय. शिंदे गटाकडून किरण सामंत हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, तर भाजपला सुद्धा या जागेवरून नारायण राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं होते. मात्र आता सुत्रांनुसार, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार भाजपच्या वाट्याला जाऊन नारायण याने हे उमेदवार असतील. किरण सामंत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे राजकीय गणित बघायचं झाल्यास, याठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रत्येकी २ आमदार आहेत. यापूर्वी २००९ मध्ये नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता, मात्र त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांनी राणेंना धूळ चारत त्याठिकाणी शिवसेनेचा बघावा फडकावला होता. आता राणे राऊतांचा पराभव करत मुलाच्या पराभवाचा बदला घेणार कि विनायक राऊत पुन्हा एकदा राणेंना अस्मान दाखवत खासदारकीची हॅट्रिक पूर्ण करणार हे पाहावं लागेल.