खासदार निधी कसा वापरायचा हे खासदारांना माहित नाही

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । प्रतिनिधी

खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा हे माहित नाही म्हणून मागील दहा वर्षांपासून साताऱ्याचा विकास थांबला आहे. त्यामुळे आता साताऱ्याचा खासदार बदलण्याची वेळ आली आहे असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र पाटील यांनी जावळी विधानसभा मतदारसंघाचा आज झंझावाती दौरा केला. त्यावेळी त्यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली.

जावळीचा आमदार सभागृहात उपस्थित असतो. तो इथल्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडतो. मात्र इथला खासदार सभागृहात जातच नाही. इथल्या लोकांचे प्रश्न सभागृहात मांडताच नाही. त्यामुळे खासदार बदलण्याची वेळ आता आली आहे असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

मी विधान परिषदेचा आमदार आहे. अधिवेशन काळात मी कधीही घरी झोपत नाही. सभागृहात उपस्थित राहून माथाडी कामगारांचे, शेतकऱ्यांचे आणि धरणग्रस्तांचे प्रश्न मी सभागृहात मांडत असतो असे नरेंद्र पाटील म्हणाले. तसेच उदयनराजे भोसले यांचे नाव नघेता नरेंद्र पाटील यांनी उद्यनराजेंवर टीका केली आहे. राजांच्या गादीचा वारसा त्यांच्या घरात जन्माला आल्याने मिळाला असेल मात्र तो वारसा सांभाळायला अंगात तेवढीच रग लागते असा टोला त्यांनी लगावला आहे.