कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
नरेंद्र मोदी हे देशातील कोरोना परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरलेले आहेत. संपूर्ण 100 टक्के अपयश आहेत. अपयशाची कारणांमध्ये तज्ञांनी दिलेला सल्ला ऐकायचा नाही. मनमानी कारभार करायचा आहे, एक दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळे कोणताही तज्ञ सल्ला देण्यास जात नाही. तसेच विचारल्याशिवाय कोणीही बोलण्याला काही अर्थ नाही हे तज्ञांना माहिती झालेले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नरेंद्र मोंदीकडून अनेक चुका झालेल्या आहेत. वेळेवर लसीची मागणी केलेली नाही. त्यामुळे लसीचा बोजवारा उठलेला आहे. लस नसताना 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस दिली जाणार असल्याचे सांगितले गेले. शेवटी लसीकरण बंद करावे लागले, तो गोंधळ झाला आहे. व्यवस्थापन करण्यात नरेंद्र मोदी अपयशी पूर्णपणे ठरलेले आहेत, आतापर्यंत जगातल्या कुठल्याही देशाने जबाबदारी टाळलेली नाही. राज्य सरकार किंवा खासगी दवाखान्यावर जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे स्पर्धा होते आणि किमंती वाढतात. यामध्ये फायदा हा केवळ लस उत्पादकांचा होतो.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/398448321317048
जगात कुठल्याच देशाने केले नाही ते मोदींनी केले
माझी मागणी अजूनही अशी आहे, नरेंद्र मोदीनी केंद्र सरकारकडून सर्व लसीची एकच आॅर्डर लस निर्मात्यांना दिली पाहिजे. त्यामध्ये कमीत कमी लसीची किंमत ठेवली पाहिजे. जगात कुठल्याच देशाने केले नाही, ते नरेंद्र मोदीनी केलेले आहे. स्वतः वरील जबाबदारी झटकून ती राज्य सरकारवर ढकलेली आहे. यामध्ये केवळ लस उत्पादकांना फायदा मिळवून देण्यापेक्षा दुसरे काहीही दिसत नाही.