हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी दरम्यान त्यांनी पुण्यातील प्राच्यविद्या क्षेत्रात जागतिक कीर्तीची संशोधन संस्था अशी मान्यता पावलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा देखील केली. भांडारकर इन्स्टिट्यूटने महाभारतावर ऑनलाईन कोर्स सुरू केला. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याचं मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, पुण्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. या संस्थेने महाभारताचं महत्त्व अधोरेखित करणारा ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे. देशभरातील लोकांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. हा कोर्स भलेही आता सुरू झाला असेल मात्र, या कोर्समध्ये जो कंटेट शिकवला जातो तो तयार करण्याची सुरुवात शंभर वर्षापूर्वीच झाली होती, असं मोदींनी स्पष्ट केलं.
जेव्हा संस्थेने याच्याशी निगडीत अभ्यासक्रम सुरू केला, तेव्हा त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मी या जबरदस्त प्रारंभाची चर्चा यासाठी करतोय, कारण लोकांना माहिती व्हावी की आपल्या परंपरेच्या विविध पैलूंना कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने सादर केले जात आहे.