सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी,
माथाडींचे आराध्य दैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी व माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे गुरुवार दि.२५ एप्रिल २०१९ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी मुंबई येथील खाजगी रूग्णालयात दु:खद निधन झाले. त्याच्या पाश्चात दोन मुली, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.
माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली होती. स्व.आमदार अण्णासाहेबांच्या निधनानंतर माथाडी कामगार चळवळ पुढे नेह्ण्यासाठी त्यांनी खंबीरपणे माथाडी नेत्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत माथाडी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला.
स्व.अण्णासाहेब पाटील यांचे कार्य पुढे नेह्ण्यासाठी त्या नेहमीच पुढे येवून कार्यात सहभागी होत असत. स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या आकस्मित निधनानंतर कुटुंबियातील सर्वांना त्यांनी मातोश्री व पिताश्रीच्या भूमिकेत राहून येणा-या प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठी पाठबळ दिले. वत्सलाताई अण्णासाहेब पाटील या माथाडी कामगार चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होत्या त्यामुळे त्यांच्याबद्दल कामगारांमध्ये एक वेगळी आस्था होती. त्यांच्या निधनामुळे कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे पार्थिव शुक्रवार दि.२६ एप्रिल,२०१९ रोजी सकाळी ९:०० वाजता माथाडी भवन, तुर्भे, नवीमुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
007 मधलं आता 7 जाणार अन् फक्त 00 राहणार – उद्धव ठाकरे
लोकसभा मतदान : दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज होणार मतयंत्रात बंद
साताऱ्यात लोकसभेचा प्रचार शिगेला ;२३ एप्रिलला मतदान
पाटीलांच्या मिशीचा पिळाच इतका मजबुत की त्यांना काॅलर उडवायची गरज नाही – ठाकरे