सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
निवडणुकीच्या काळात टीकेची झोड कोणत्या प्रकारे उठवली जाईल हे सांगता येणार नाही. शिवसेनेचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर टीका केली आहे.
“कोणी दिवसभर काॅलर वर करुन चालु शकत नाही. मात्र माझी मिशी मी दिवसभर टाईट करुन चालु शकतो. लोकांना माझी मिशी आवडते हा साता-याचा मर्दपणा आहे” असे सांगुन उदयनराजेंच्या टीकेला नरेंद्र पाटील यांनी प्रतित्तर दिले आहे.
त्याच प्रमाणे, खासदार उदयनराजे यांची संसदेत उपस्थिती किती? खासदार निधी परत गेल्याची नामुष्की का आली? याचे उत्तर उदयनराजेंनी जनतेला दयावे असे देखील नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या उत्तरामुळे साताऱ्याच्या राजकारणात नव्याने रंग भरले जाण्याची शक्यता आहे.
नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले प्रश्न
१)उदयनराजेंनी संसदेत किती हजेरी लावली ?
२)सातारकरांच्या आणि केंद्रातील प्रश्नांवर संसदेत उदयनराजे किती वेळा सहभागी झाले?
३)GST आणि नोटाबंदीत जनतेच बरेच नुकसान झाल्याच खासदार सांगतात मात्र त्यांनी याविषयी किती संसदेत आवाज उठवला ?
४)खासदार म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट असतो का?
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये
म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले
म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले
साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा
उदयनराजेंना टोलापिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले