जबरदस्त कामगिरी! नासाच्या यानाचे मंगळावर यशस्वी लँडिंग; पाठवले पहिलं छायाचित्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’चे Perseverance रोव्हर मंगळावर दाखल झाले आहे. या रोव्हरने घेतलेले मंगळावरील पहिले छायाचित्र नासाने जारी केले आहे. मंगळवरील जीवसृष्टीचा शोध या मोहिमेतून घेतला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री दोन वाजून २५ मिनिटांच्या सुमारास Perseverance रोव्हरने मंगळावर लँडिंग केले. रोव्हर मंगळावर उतरल्यानंतर नासाने पहिले छायाचित्र जारी केले. अंतराळ संशोधनाच्यादृष्टीने ही मोहीम महत्त्वाची समजली जाते.

या मोहिमेद्वारे नासा, मंगळावर जीवसृष्टी होती का, सध्या जीवसृ्ष्टी असू शकते का, याबाबत संशोधन करण्यात येणार आहे. पर्सिव्हरन्समध्ये (Perseverance) २३ कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यातून आवाज आणि व्हिडिओ रेकोर्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन मायक्रोफोन्सही लावण्यात आले आहेत. रोव्हरसह दुसऱ्या ग्रहावर जाणारे पहिले हेलिकॉप्टर Ingenuity देखील आहे.

नासाने आपल्या ट्विटर हॅण्डलवर मंगळ ग्रहावर दाखल झालेल्या रोव्हरचा फोटो जारी केला. यामध्ये Perseverance च्यावतीने ‘माझ्या घरातील माझा पहिला लूक’ असं कॅप्शनही दिलय. नासाने रोव्हरच्या दुसऱ्या बाजूनेही एक फोटो शेअर केला आहे. मंगळावर जेजेरो क्रेटरवर उतरलेल्या रोव्हरच्या मदतीने मंगळ ग्रहावरील अनेक रहस्यांवरील पडदा उठण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या मोहिमेतील ७ मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. या सात मिनिटांत क्राफ्ट १२ हजार मैल प्रतितास इतक्या वेगापासून कमी होऊन ते शून्य मैल प्रतितास या वेगाने मंगळाच्या पृष्ठाभागावर उतरणार होता. त्यामुळेच मंगळ मोहिमेच्या दृष्टीने ही ७ मिनिटे महत्त्वाची ठरली. वेग कमी करण्यासाठी पॅराशूट आणि रेट्रोरॉकेट लावण्यात आले होते. वेग नियंत्रित करून मंगळाच्या पृ्ष्ठभागावर उतरल्यानंतर खड्डे आणि इतर अडथळ्यांपासून बचाव करण्याचे आव्हान होते. रोव्हरने या अडथळ्यांवर मात करून यशस्वीपणे लँडिंग केले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment