हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन NASA Warning Sinking Cities India। मुंबईसह भारतातील ५ प्रमुख शहरे येत्या काही वर्षात पाण्याखाली जातील असा मोठा इशारा NASA ने दिला आहे. जागतिक तापमानवाढ आणि समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीमुळे या शहरांना आणि तेथील नागरिकांना धोका आहे. मुद्रकिनारी असलेली आणि कमी उंचीची शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता NASA ने वर्तवली आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई, सुरत आणि अहमदाबाद यांसारख्या भारतातील प्रमुख शहरांचा समावेश आहे. सिंगापूरच्या एनटीयू अभ्यासानुसार, हवामान बदल आणि भूजलाचे शोषण ही यामागची प्रमुख कारणे आहेत. कोणत्या शहराची पाणी पातळी कशा पद्धतीने वाढत आहे याची माहिती आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.
१) मुंबई-
मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आन बाण शान… देशातील सर्वात महत्वाचं शहर आणि आर्थिक राजधानी असलेली मुंबई म्हणजे भारताचा आत्मा आहे. मात्र अरबी समुद्रावर वसलेलं हे शहर वाढत्या पाणी पातळीमुळे चिंतेत आहे. मुंबईबाबत इशारा देताना नासाने म्हंटल आहे कि, २१०० पर्यंत मुंबई १.९० फूट पर्यंत पाण्यात बुडू शकते. समुद्राची पातळी वाढणे आणि भूजलाचे शोषण ही याची कारणे असतील. मुंबईत पुराचा धोका आधीच जास्त आहे आणि भविष्यात परिस्थिती आणखी चिंताजनक असेल.
२) कोलकाता – NASA Warning Sinking Cities India
पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता हे भारताच्या पूर्व भागातील महत्वाचं शहर आहे. बंगालच्या उपसागरालगत गंगा नदीच्या खाडीवर वसलेल्या या शहरालाही समुद्राचा मोठा धोका आहे. कोलकाता कमी उंचीवर आहे आणि गंगा नदीच्या डेल्टा क्षेत्रात वसलेले आहे, ज्यामुळे समुद्राच्या पातळीतील वाढ आणि पूर यांचा धोका वाढतो. २०१४ ते २०२० दरम्यान, कोलकात्यातील जमीन दरवर्षी ०.०१ ते २.८ सेंटीमीटरने बुडाली आहे. भाटपाडा परिसरात दरवर्षी सर्वाधिक २.६ सेमी पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. २०२४ मध्ये समुद्राची पातळी ०.५९ सेमीने वाढली आहे. चिंतेची बाब म्हणजे या भागात ९० लाख लोक राहतात, जिथे पूर आणि भूकंपाचा धोका वाढला आहे.
३) चेन्नई –
तामिळनाडूची राजधानी असलेली चेन्नई हे दक्षिण भारतातील महत्वाचं शहर मानलं जाते. कोरोमंडल किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरालगत वसलेल्या चेन्नईला समुद्राच्या पातळीतील वाढीमुळे धोका निर्माण झालाय. चेन्नईची भौगोलिक रचना कमी उंचीची आहे. यामुळे समुद्राच्या पातळीतील वाढ आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढतो. चेन्नईमध्ये दरवर्षी ०.०१ ते ३.७ सेंटीमीटर. थरमणी परिसरात सर्वाधिक ३.७ सेंटीमीटर भूस्खलन झाले आहे. २०२४ मध्ये चेन्नईच्या समुद्राची पातळी ०.५९ सेंटीमीटरने वाढली आहे, असे नासाने म्हटले आहे. या भागात १४ लाख लोक राहतात, जिथे भूजलाचा जास्त वापर हे याचे कारण आहे.
४) सुरत
तापी नदीच्या काठावर वसलेल्या गुजरातमधील सुरत शहरालाही वाढत्या पाणी पातळीचा धोका निर्माण झालाय. भूजलाचा अतिवापर आणि हवामान बदल ही याची कारणे आहेत. सुरत हे गुजरातमधील दुसरे आणि भारतातील आठवे सर्वात मोठे शहर आहे. सुरतला “डायमंड सिटी” आणि “सिल्क सिटी” म्हणूनही ओळखले जाते, तसेच सुरत हे एक मोठे औद्योगिक शहर आहे. त्यामुळे सुरत पाण्याखाली गेल्यास मोठं नुकसान होऊ शकते.
५) अहमदाबाद –
येत्या काही वर्षात समुद्रात बुडेल (NASA Warning Sinking Cities India) असं गुजरात मधीलच दुसरं शहर म्हणजे अहमदाबाद…. २०१४ ते २०२० पर्यंत, अहमदाबादमधील जमीन दरवर्षी ०.०१ ते ५.१ सेमीने पाण्याखाली जात आहे. विशेषतः पिपलाज परिसरात सर्वाधिक ४.२ सेमीचा भूस्खलन दिसून आला. या बुडालेल्या भागात ५१ लाख लोक राहतात. समुद्राची पातळी ०.५९ सेमीने वाढल्याने पुराचा धोका वाढला आहे, याचे मुख्य कारण भूजलाचे शोषण आहे.




