नाशिक प्रतिनिधी | नाशिक शहराला रविवारी भुकंपाचा मोठा धक्का बसला. शहरापासून 101 कि.मी. अंतरावर भुकंपाचा केंद्रबिंदू सापडला असून 3.5 मॅग्निट्युड तीव्रतेच्या भुकंपाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार आज संध्याकाळी महाराष्ट्रात नाशिकजवळ 3.5. मॅग्निट्युड तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू नाशिकच्या 101 कि.मी. पश्चिमेकडे होते, अशी माहिती एजन्सीने दिली. भूकंप पृष्ठभागापासून 5 कि.मी. खोलीत रात्री 10:00 वाजता झाल्याचे समजत आहे.