अचानक चक्कर आल्यास कोणते उपाय करावेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काही काही लोकांना आपल्या दैन्यंदिन कामकाजातील काही कामामुळे तर कधी कधी थकवा आल्यानंतर अचानक क चक्कर वैगेरे येण्याच्या समस्या निर्माण होतात. कधी कधी चक्कर येण्याचा प्रकार हा अनुवांशिक असतात. पुष्कळ लोकांना सकाळी उठल्याबरोबर चक्कर येते. काहींना दुपारी तर काहींना केव्हाही येते. चक्कर येते म्हणजे आपल्या शरीरात कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रमाण हे कमी असते त्यामुळे चक्कर येते.

— जर सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे चक्कर येत असेल तर अशा वेळी बासमती जुना तांदूळ एक मूठभर घेऊन तो साजूक तुपावर भाजून घेऊन न धुता त्याची पेज करावी. ती चांगली घुसळून एकजीव झाल्यावर चवीला मीठ टाकून एक ग्लासभर तयार करावी. सकाळी उठल्यावर तोंड धुतल्यावर अनोशापोटी ती पेज घ्यावी. नंतर एक तासाने काही खायचे असल्यास खावे. हा बासमती तांदूळ साठविताना त्यात बोरीक पावडर घालू नये, कारण न धुता पेज करायची असते. म्हणून तांदूळ साठवताना कडुनिंबाचा पाला टाकल्यास उत्तम. जुना तांदूळ जास्त परिणामकारक असतो.

— उन्हातून जाऊन आल्यावर चक्कर येते. अशा वेळी एक कप पाण्यात अर्धे लिंबू पिळून ते मिश्रण प्यावे.

— आवळे आणून ते स्वच्छ धुवून ते बारीक काडीने टोचावेत. नंतर ते मिठात टाकून बरणीत भरून ठेवावेत. मुरलेले आवळे चक्कर आल्यावर त्यातील मोठा आवळा असल्यास अर्धा व लहान असल्यास एक खावा.

— ओवा भाजून थोडे लोणकढे घालून व किंचित सैंधव घालून त्याची पावडर करावी. अर्धा चमचा साजूक तूप त्यामध्ये एक चमचा एक चमचा मध आणि एक चमचा ओवा पावडर यांचे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्यावे.

— आवळ्याचा मोरावळा दिवसातून तीन वेळा घ्यावा.

— माक्‍याच्या पानांचा रस काढून तो दोन चमचे, असे तीन वेळा घ्यावा.

— आमसुले ४ ते ५ दररोज खावेत.

— उन्हाळ्याच्या दिवसात चक्कर येण्याचे प्रमाण जास्त असते . कारण आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण हे कमी झालेले असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment