नाशिकमध्ये चुकून एक्सलेटर वाढवला अन् तरुणी स्कूटीसह थेट ATM Center मध्ये घुसली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – स्कूटी चालकांकडून चुकून एक्सलेटर वाढवल्याने अपघात झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये एका तरुणीने ब्रेक ऐवजी चुकून एक्सलेटर वाढवला आणि ती स्कूटीसह थेट समोरील एटीएममध्येच शिरली. हि संपूर्ण घटना एटीएमच्या (ATM Center) बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कुठे घडली घटना ?
नाशिकमधील सावता नगर परिसरात ही घटना घडली आहे. एका एटीएम सेंटरसमोर (ATM Center) एक तरुणी स्कूटीवर बसली होती. त्याच दरम्यान चुकून तरुणीकडून गाडीचा एक्सलेटर वाढला. एक्सलेटर जोरात दिल्याने गाडीने लगेचच वेग पकडला. यानंतर तिला गाडी कंट्रोल नाही झाली. स्कूटी इतकी जोरात होती की, समोर असलेल्या एटीएमची (ATM Center) काच फोडून तरुणी स्कूटीसह एटीएमच्या आत शिरली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, एटीएम आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम

‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका

Leave a Comment