नवी दिल्ली | क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार तर रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ ची घोषणा करण्यात आली. मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारोत्तोलक एस.मीराबाई चानू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. एकूण ६ श्रेणींमध्ये ३५ खेळाडू व प्रशिक्षक आणि ३ संस्थाना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे..
उत्तम कामगिरीसाठी #मुंबई येथील क्रिकेटपटू #स्मृतीमानधना यांना #अर्जुनपुरस्कार जाहीर. #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते @mandhana_smriti यांना दिल्लीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार . 5 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.#SportsAward pic.twitter.com/51yrsW8PZb
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) September 21, 2018
#राष्ट्रीयक्रीडापुरस्कार घोषित : गेल्या चार वर्षातील सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीसाठी #महाराष्ट्र कन्या, नेमबाज #राहीसरनोबत यांना #अर्जुनपुरस्कार जाहीर.25 सप्टेंबर 2018 रोजी #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते @SarnobatRahi यांना दिल्लीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार .#SportsAward pic.twitter.com/oC7ATHqOAM
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) September 21, 2018
कुस्ती प्रशिक्षक म्हणून दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी #कोल्हापूर जिल्ह्यातील रुस्तम-ए-हिंद व भारत केसरी #दादूदत्तात्रयचौगुले यांना #ध्यानचंदपुरस्कार जाहीर. रुपये 5 लाख रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.#SportsAward pic.twitter.com/Zcx1xuY5Be
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) September 21, 2018