अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । संकटात दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी धाडस दाखवलेल्या बालकांना दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. यंदा दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची यादी जाहिर झाली असून महाराष्ट्रातील दोन बालकांचा यात समावेश आहे. देशभरातून १० मुली आणि १२ मुलं अशा एकूण २२ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांची निवड राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी झाली आहे. देशभरतून निवडलेल्या इतर बालकांसोबत  महाराष्ट्राच्या या दोन वीर बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मुंबईतील क्रिस्टल टॉवर आगीत झेन दाखवलं अतुलनीय धाडस

मुंबईतील क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागली. त्यावेळी सहावीत शिकणाऱ्या झेन सदावर्तेने जागरुकपणे १३ जणांचे प्राण वाचवले. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. अशावेळी एखाद्याचा मृत्यू गुदमरुन होण्याची शक्यता असते. मात्र अशा व्यक्तीच्या तोंडावर ओले कापड ठेवल्यास श्वास घेण्यास त्रास होत नाही. याच धड्यातील माहितीचा वापर करुन झेन सदावर्तेने मुंबईतील क्रिस्टल टॉवर आगीत १३ जणांचे प्राण वाचवले.

बुडणाऱ्या माय-लेकींना वाचविण्यासाठी आकाशने दाखवलं धाडस

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या आकाश खिल्लारेने एका पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला.  नदीवर कपडे धुण्यासाठी आई आणि मुलगी गेल्या होत्या. त्यावेळी तिची मुलगी पाण्यात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. मात्र दोघीही बुडू लागल्या. त्याचवेळी तिथून आकाश चालला होता. आकाशने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली आणि या दोघींचा जीव वाचवला.

राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचे स्वरुप 

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा भारतातील १६ वर्षाखालील २५ शूर बालकांना दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असते. ही पुरस्कारप्राप्त मुलं प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन

मजुराच्या मुलाचा ह्रदय हेलावून टाकणारा निबंध; बीडची स्नेहसावली संस्था करणार स्वप्न पूर्ण

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले

Leave a Comment