हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदींची सदिच्छा भेट घेऊन राज्यासाठी आर्थिक मदत मागू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मी पंतप्रधानांना भेटायला जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच म्हटलं होतं. ‘मुख्यमंत्री झाल्यावर मी दिल्लीला जाणार आहे. माझ्या मोठ्या भावाची भेट घेणार आहे. कारण पंतप्रधान मोदी मला त्यांचा लहान भाऊ म्हणतात,’ असं उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना संबोधित करताना म्हणाले होते.
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपाला तब्बल अडीच दशकांहून जास्त काळ असलेली युती तोडत शिवसेनेनं थेट काँग्रेस, राष्ट्रवादीची घरोबा केला. या तीन पक्षांनी राज्यात सत्ता स्थापन करत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या सत्तेपासून दूर ठेवलं. राज्यात सत्ता स्थापन करण्यापूर्वी शिवसेना केंद्र सरकारमधूनही बाहेर पडली. यामुळे शिवसेना आणि भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले. मात्र उद्या उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे.