तिवरे धरण फुटीतून मोदींनी घेतला धडा ; मंत्री मंडळ बैठकीत ‘या’ निर्णयावर एकमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | तिवरे धरण फुटल्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आज पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत धरण देखभाल आणि दुरुस्तीसाठी कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिवरे धरण दुर्घटनेतून जलसंपदा आणि जनसंपदा यांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

धरण फुटीतून जीवित हाणी होतेच तसेच अनेक वर्ष पैसे खर्चून उभा केलेल्या विकास कामाची देखील हानी होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने धरणाच्या सुरक्षेसाठी कायदा बनवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हणले आहे.

तिवरे धरणाला गळती लागली असतानाच येथील गावकऱ्यांनी सरकारला या संदर्भात माहिती दिली होती. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हि धरण दुर्घटना झाली हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर शासन करण्याची तरतूद या कायद्यात केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment