National Education Day | आपल्या आयुष्यात शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे. शिक्षणामुळेच आपला देश प्रगती प्रगती आहे. तसेच माणसाची प्रगती होते, सुसंस्कृत होतो. शिक्षणाच्या आधारावरच आजकाल मानवाची गुणवत्ता ठरवली जाते. माणूस जेवढा शिकतो तेवढा तो जास्त बुद्धिमान होतो. आणि याच शिक्षणाचा आदर करण्यासाठी दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) साजरा केला जातो.
2008 पासून हा राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. संपूर्ण देशात शिक्षणाबाबतची जनजागृती व्हावी. तळागाळातील अगदी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटावे. आणि त्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी हा राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण हा राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त आज आपण त्याचा इतिहास समजून घेणार आहोत.
राष्ट्रीय शिक्षण दिनाची सुरूवात | National Education Day
भारत स्वतंत्र झाल्यानंतर मौलाना अबुल कलाम हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. 5 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत ते भारताचे शिक्षण मंत्री होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे खूप जास्त योगदान योगदान दिलेले आहेत. आणि अनेक नवीन बदल देखील केलेले आहेत. त्यांच्या काळात त्यांनी विविध साहित्य, अकादमी, ललित कला आणि संगीत नाटक यांची स्थापना केलेली आहे. 11 नोव्हेंबरला त्यांची जयंती अस.ते आणि त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि संपूर्ण देशात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
मौलाना अबुल कलाम आझाद कोण होते?
मौलाना अबुल कलाम हे महान स्वतंत्र सैनिक शिक्षण तज्ञ पत्रकाराने एक चांगले उत्कृष्ट होते. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता. ते गांधीजींचे समर्थक होते. त्यांनी जवळपास दहा वर्ष भारताचे शिक्षणमंत्रीपद भूषवले आहे. 22 फेब्रुवारी 1958 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी केलेल्या कार्याची माहिती संपूर्ण देशाला व्हावी. तसेच शिक्षणाचे महत्त्व पटावे. यासाठी त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी म्हणजेच आज 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व | National Education Day
आजकाल प्रत्येकासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण हे व्यक्ती आणि समाजामध्ये एक पारदर्शकता आणते. आणि एक महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणाबद्दल अधिकाधिक जागृती निर्माण व्हावी. आणि शिक्षणाच्या प्रवाहात प्रत्येकाने सामील व्हावे. यासाठी हा राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.