जगभरातील Gmail सर्व्हर डाउन; ई-मेल सेंड होत नसल्याने जगातील युजर्स वैतागले

मुंबई । जगभरातील Gmail सर्व्हर डाउन झाल्यामुळे युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही तासांपासून Gmailचं सर्व्हर डाउन झाल्यामुळे युजर्सना मेल सेंड करता येत नसल्याचं दिसून येत आहे. फक्त Gmail नाही तर गूगल ड्राईव्ह संबंधित समस्या देखील डोकवर काढत आहेत. नेहमी असंख्य कामांसाठी Gmail, गूगल ड्राईव्ह आणि हॅगआऊटच्या माध्यमातून रोजची कामे करणं सोपं होत. पण काही युजर्सनी अटॅचमेंट फेल होण्याची तक्रार सोशल मीडियावर केली आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या काही लोकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण येत्या काही वेळेत याचे प्रमाण वाढू शकते. मेल सेंड करताना अटॅचमेंट फेल होण्याची तक्रार सतत येत आहे. त्याचप्रमाणे ड्राफ्ट मेल सेव्ह करण्यास आणि सेंड करण्यात देखील अडचणी येत आहेत.

परिणामी ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. सध्या कोरोना सारख्या महामारीच्या काळात असंख्य व्यवसाय डिजिटल पद्धतीच्या आधारे सुरू आहे. सोशल मीडीयावर युजर्सने तक्रार केल्यानंतर ‘गुगल अ‍ॅप्स स्टेटस पेज’च्या माध्यमातून गुगलनेही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली. Gmailमध्ये समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून लवकरात लवकर समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं गुगलने म्हटलं आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजेपासून युजर्सना ही समस्या जाणवायला सुरूवात झाली. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, जपान आणि युरोपमधील काही भागांमध्ये युजर्सना या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com