महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही मुख्यमंत्री ‘धनुष्यबाणाचा’च

झारखंड | झारखंड विधानसभेचा निकाल आज लागला. येथे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आघाडी घेतली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. तसेच, झारखंडच्या आदिवासी गरीब जनतेने भाजपला नाकरल्याची प्रतिक्रिया सोरेन यांनी दिली आहे. 2019 मध्ये भाजपने … Read more

धक्कादायक! गौतम गंभीरला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी

दिल्ली | माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर याने माध्यमांना दिली आहे. धमकी प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे. गौतम गंभीर क्रिकेटसह विविध मुद्द्यांवर … Read more

देशातील नागरिकांनी हिंसाचार,भीती पसरवणाऱ्यांपासून सावध रहावे; सोनियांच्या आरोपाला सीतारमण यांचे प्रत्युत्तर

संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडल्यापासूनच विरोधी पक्षकाडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर नागरिकांनीही रस्त्यावर उतरून मोठा विरोध दर्शविला आहे

एल्गार परिषदेतील भाषणांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे हा सत्तेचा गैरवापर – शरद पवार

पुणे प्रतिनिधी | एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल पुणे पोलिसांनी काही जणांवर शहरी नक्षलवादाच्या नावाखाली अटक करत त्यांच्यावर देशद्रोहाचा घटला भरला होता. मात्र सदर कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर असून त्याबाबत एस.आय.टी. कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी … Read more

भारत धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई प्रतिनिधी | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन पेटले आहे . यापार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली . सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता … Read more

CAA ला विरोधच पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही;बसपाच्या अध्यक्षा मायावती यांचे ट्विट  

नागरिकत्व सुधारणा कायद्याला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनही केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे नेमकं काय?; वाचा सविस्तर…

प्रफुल्ल पाटील। २०१४ साली केंद्रात सत्ता परिवर्तन झाले. नरेंद्र मोदी सर्वोच्च पदी विराजमान झाले. त्यानंतर मात्र बरेच विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था यांचा कुठल्या ना कुठल्या कारणावरून थेट केंद्र सरकारशी संघर्ष होत राहिला. कदाचित केंद्र सरकारची आडमुठेपणाची भूमिका हे त्यामागचे कारण असावे. स्मृती इराणी यांच्या मानव संसाधन विकास मंत्रिपदाच्या काळात तर हा संघर्ष शिगेला पोहोचला. त्यानंतर … Read more

फरहान, तू सुद्धा कायदा मोडतोयस; ‘CAA’ च्या विरोधावर आयपीएस अधिकाऱ्याने दिली कायद्याची समज

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन अनेक सेलिब्रिटी लोक आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनेही ट्विट करत आपली भूमिका मांडली होती.

दिल्ली निर्भया प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली; चौघांचीही फाशी कायम

या खटल्याच्या मूळ निकालात त्रुटी नसल्याने त्याचा फेरविचार करण्याचा प्रश्नच नाही. हे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ या प्रकारात मोडत असल्याने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात येत असल्याचं न्यायमुर्ती आर. बानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं .

सना लहान आहे, तिला अशा प्रकरणापासून दूर ठेवा; सना गांगुलीची पोस्ट व्हायरल

सना गांगुलीने खुशवंत सिंह यांच्या ‘द एंड आफ इंडिया’ या पुस्तकातील काही भाग शेअर करुन देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे.