मध्यप्रदेशातही राजकीय भूकंप ?? ज्योतिरादित्य सिंधिया भाजपच्या वाटेवर…?

विशेष प्रतिनिधी । गेल्या महिन्याभरापासुन देशाच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणानंतर आता मध्यप्रदेश मधील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यप्रदेश मधील काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार राजकीय चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चांना पुष्टी म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर केलेल्या बदलाची जोडण्यात येत आहे. त्यामुळेच अनेक … Read more

शरद पवार सच्च्या मराठा योद्ध्याप्रमाणे लढत आहेत, कोण म्हणतंय असं??

मुंबई | बातमी वाचण्यापूर्वी ही रघुराम राजन यांच्या नावाने काल्पनिक अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या या भावना आहेत, हे सांगणं गरजेचं…!! रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि जागतिक अर्थतज्ञ रघुराम राजन यांचं नाव वापरून एका व्यक्तीने शरद पवारांना मराठा योद्धा असं म्हणत त्यांच्या लढवय्यापणाचं कौतुक केलं आहे. शरद पवार जिंकतील किंवा हारतील पण ते एका सच्चा मराठा योद्ध्याप्रमाणे … Read more

बाळासाहेबांची शिकवण शिवसेना विसरली – रविशंकर प्रसाद

महाराष्ट्रातील अनपेक्षित सत्तास्थापनेनंतर सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया येत असून केंद्रातील भाजपचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने भाजपसोबत असलेल्या युतीचा आणि मिळालेल्या स्पष्ट जनादेशाचा सन्मान केला नाही असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी आज स्थापन झालेलं सरकार महाराष्ट्राला दिशादर्शक वाटेवर पोहचवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

सत्तास्थापनेबाबत नितीन गडकरींच ‘हे’ विधान खरं ठरलं

आजची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात अचंबित करणारी ठरली. इतके दिवस सत्तास्थापनेच्या चर्चेत भाजप गायब होती तर तिकडे शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात नवं नातं सरकारस्थापनेच्या निमित्ताने तयार होत असताना. अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात भाजपने गनिमी काव्याचा वापर करत सत्तास्थानेच दावा केला, तो ही राष्ट्रवादीची बुलंद तोफ असणाऱ्या अजित पवार यांच्या मदतीने. अशाप्रकारे फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

आमची चूक नाही राष्ट्रवादीने उशीर केला- अहमद पटेल

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेल्यातानंतर काँग्रेसवर सत्तास्थापनेचा उशीर केल्याचे आरोप होत आहेत. मात्र निर्णय घेण्यात आम्ही उशीर केला नसून राष्ट्रवादीनेच उशीर केल्याचं खापर काँग्रेसने आता राष्ट्रवादीवर फोडलं. राष्ट्रवादीच्या वेळकाढूपणाचा फटका सत्तास्थापनेचा निर्णय घेताना बसला असल्याचे स्पष्टीकरण आता काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी दिल आहे. आज राज्यात जो काही प्रकार घडला त्याला राष्ट्रवादी जबाबदार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानेच भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकली. अशी प्रतिक्रिया पटेल यांनी माध्यमांना दिली. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री, राज्यात भाजप राष्ट्रवादीचं सरकार स्थापन

मुंबई | शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. Devendra Fadnavis to take oath as Maharashtra Chief Minister again,NCP's Ajit Pawar to take oath as Deputy CM … Read more

नेमबाजी विश्वचषक फायनल्स; मनु भाकरने सुवर्णपदक जिंकले

हॅलो महाराष्ट्र, प्रतिनिधी । भारताच्या मनु भाकरने पुटियान (चीन) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आज सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) प्रतिष्ठेच्या हंगामात १७ वर्षीय मनू भाकरने २४४. गुणांची नोंद केली. तिचा प्रतिस्पर्धी यशस्विनीसिंग देसवालने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहावे स्थान मिळविले. सर्बियाच्या … Read more

शरद पवारांना भाजपकडून खरोखर राष्ट्रपती पदाची आॅफर आहे का?

मुंबई | राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तास्थापनेबाबत बैठकांवर बैठका घेत असताना भाजपने मास्टरस्ट्रोक ठोकला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपकडून राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं बोललं जात आहे. एनडीटीव्हीने पवारांना राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं वृत्त दिले आहे. शरद पवार आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. … Read more

न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

दिल्ली प्रतिनिधी । न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती बोबडे यांना मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या संक्षिप्त कार्यक्रमात त्यांनी ईश्वराच्या नावाने इंग्रजीमध्ये शपथ घेतली. न्यायमूर्ती बोबडे यांचा सरन्यायाधीश म्हणून एकूण १७ महिन्यांचा कालावधी असेल, ते २ एप्रिल २०२१ रोजी … Read more