देशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा पुनरुच्चार

राज्यात निष्क्रिय झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादी कारवायांना अटकावच होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकारचं कौतुक योगी आदित्यनाथ यांनी केलं.

‘जिओ’कडील ‘फ्री कॉलिंग’चे दिवस गेले

आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

बीएसएनएल, एमटीएनएल बंद होणार?

वाढते कर्ज व घटते उत्पन्न यामुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.

‘इन आँखों की मस्ती’ को आज भी ‘इजाजत’ हैं – ‘खुबसूरत’ रेखा से ‘इश्क’ करने की

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत ‘इजाजत’चे स्थान फार वरचे आहे…. ‘इजाजत’ केवळ एक सिनेमा नाही तर जीवनातील नात्यांचा हळुवार उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे.

रसायनशास्त्रातील यंदाचं नोबेल लिथीयम आयन बॅटरीच्या विकासासाठी

रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकांची घोषणा बुधवारी करण्यात आली. लिथीयम आयन बॅटरीच्या विकासात्मक कल्पना मांडल्याबद्दल तिघांना हे पारितोषिक देण्यात आलं आहे. जॉन बी गुडेनफ, एम.स्टॅनले व्हीटिंगहम आणि अकिरा योशिनो या तिघांना विभागून हे पारितोषिक देण्यात आलं आहे.

‘जेएनयू’च्या उमर खालिदवर गोळीबार करणाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी

मुंबई प्रतिनिधी। जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा आरोप असलेल्या नवीन दलाल याला शिवसेनेने निवडणुकीचे तिकीट दिले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खालिदवर गोळीबार करण्याचा आरोप असणाऱ्या नवीनला तिकीट दिले आहे. येथील बहादुरगड मतदारसंघातून नवीन शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. ‘मी सहा महिन्यापूर्वीच … Read more

काय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ??

देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

दसरा मुहूर्तावर फ्रान्सने केले राफेल भारताला सुपूर्द, राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला सोहळा

 टीम, HELLO महाराष्ट्र| आज दसऱ्याच्या मुहूर्तावर राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारताला सुपूर्द केलं. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल विमान स्वीकारलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी या विमानाची पूजा केली. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. हस्तांतरण सोहळ्या वेळी भारताचे हवाईदलप्रमुख हरजीत सिंह अरोरा सुद्धा उपस्थित होते. राफेल हा फ्रेन्च … Read more

Breaking | भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार, सुशिलकुमार शिंदेंचे मोठे वक्तव्य

एकमेकांना सहकार्य केलं तरच ते आघाडी धर्माचं पालन होईल असं म्हणत येत्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ताकदीने उभे राहतील असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.