हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे पुनर्वसन करण्यास केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समिती (एन. टी.सी.ए.) कडून मंजुरी देण्यात आली आहे.
सदर व्याघ्र पुनर्वसन प्रकल्पास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीकडून 10.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सदर प्रकल्प दोन टप्यात राबवण्यात येत असून यातील पहिला टप्पा नुकताच संपला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये देशातील इतर काही व्याघ्र प्रकल्पून वाघ आणण्यात येणार आहे. साधारणात २०२४ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये अन्य जंगलातील वाघ आणून सोडले जाणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प फेज 2 मध्ये वाघ पुनर्प्राप्ती धोरण आणि दीर्घकालीन देखरेख (5 वर्ष 2022-2027) यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीकडून 10.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्यामुळे आता वाघांना या ठिकाणी आणणे शक्य होणार आहे.
सदर प्रकल्प अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) हे असणार असून प्रकल्प समन्वयक हे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक पश्चिम वन्यजीव विभाग डॉ.व्ही. क्लेमेंट बेन हे असणार आहेत. प्रकल्पाचे कार्यकारी हे क्षेत्र संचालक व उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर/कराड असणार आहेत.
या प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक व मुख्य शास्त्रज्ञ के.रमेश भारतीय वन्यजीव संस्था ढेराडून व सह-अन्वेषक सह शास्त्रज्ञ डॉ. नावेंदू पागे, डॉ प्रशांत महाजन भारतीय वन्यजीव संस्था ढेराडून हे असणार आहेत. सदर फेज २ प्रकल्प हा पाच वर्षासाठी वनविभाग महाराष्ट्र राज्य हे वित्त सहाय्य करणार आहे.