Satara News : लोकसभा निवडणूक न लढविण्याचे उदयनराजेंनी दिले संकेत; म्हणाले, ‘माझी निवडणुकीची…’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लोकभेचा उमेदवार याबाबत गुपित ठेवलं असल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता स्वतः राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिले. माझी निवडणुकीची खाज भागली असल्याचे वक्तव्य उदयनराजेंनी केले आहे. तसेच शरद पवारांनी आता मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याचा सल्लाही उदयनराजेंनी दिला आहे.

खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने साताऱ्याची लूट केल्याचा आरोप आमदार शिवेंद्रराजेंनी केला होता. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज खा. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत विधान केले. तसेच पुढे ते  म्हणाले की, सुविधा हव्यात पण घरपट्टी नको. मग सुविधा कशा मिळणार? सुविधा हव्या असतील घरपट्टी द्यावी लागेल. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून बिनबुडाच्या आरोप केले जात आहेत. त्याला मी भीक घालत नाही. सातारा नगरपालिकेची त्यांनी ‘ईडी’ चौकशी लावावी, असा उपरोधिक टोला उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंना लगावला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/212099818428024

 

राजकारणातही रिटायरमेंटचे वय हवे

राजकारणामध्ये पण रिटायरमेंटचे वय असले पाहिजे. बघता बघता मी पन्नाशी कधी ओलांडली हे समजलं नाही, असे सांगून शरद पवार राज्यात अनेक वेळा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत असणे जास्त गरजेचे आहे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे उदयनराजे म्हणाले.

सर्वांनाच वाटतं पवारांचा सल्ला घ्यावा

काही गोष्टींचे ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळत नाही. अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. शरद पवारांचा अनुभव पाहता सर्वांना वाटतं की त्यांचा सल्ला घ्यावा, असेही उदयनराजे म्हणाले. महाराष्ट्रातील राजकारण एकाच कुटुंबीयांच्या घरात फिरत आहे. यावर उदयनराजे म्हणाले
की, कोणीही येऊ द्या चांगलेच आहे. वाद मिटला पाहिजे, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.