Monday, February 6, 2023

नवी मुंबई: न्हावा शेवा बंदरातून सव्वाशे कोटी रुपये किंमतीचे 25 किलो हेरॉईन जप्त

- Advertisement -

मुंबई । आजकाल Drugs चा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये अराजकाचे वातावरण आहे. विशेषतः बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) कारवाईमध्ये कंटेनरमधून 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे सव्वाशे कोटी रुपये आहे. हा कंटेनर नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पकडला गेला. या प्रकरणी जयेश संघवी नावाच्या व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्ट्स नुसार, नवी मुंबईतील एक 62 वर्षीय व्यापारी कथितपणे 25 किलो हेरॉईनची तस्करी इराणमधून शेंगदाणा तेलाच्या आडून करत होता. DRI च्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईच्या न्हावा शेवा येथे इराणहून आलेला एक कंटेनर ताब्यात घेतला आणि 4 ऑक्टोबर रोजी त्याची तपासणी केली.

- Advertisement -

गेल्या महिन्यात दोन महिलांना कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सुमारे 5 किलो हेरॉईनसह अटक केली होती. जप्त केलेल्या ड्रग्जची अंदाजे किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून आलेल्या आई आणि मुलीला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले. या दोघांनीही हेरोईन त्यांच्या ट्रॉली बॅगच्या बाजूच्या खिशात लपवून ठेवले होते. त्यांच्याकडे 4.95 किलो हेरॉईन सापडले. विमानतळावर कोणत्याही व्यक्तीकडून ड्रग्जची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचे सांगितले जात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की,”विमानतळावरील ही सर्वात मोठी जप्ती आहे कारण प्रवासी सहसा एका वेळी दोन किलोपेक्षा जास्त ड्रग्ज घेऊन जात नाहीत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

या वर्षी जानेवारीपासून मुंबई पोलिसांनी 3,333 अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे नोंदवले आहेत तर सुमारे 3,575 लोकांना अटक केली आहे आणि 86.50 कोटी रुपये किंमतीची 3,813 किलो विविध प्रतिबंधित ड्रग्ज जप्त केले आहेत. ANC ने यापैकी 88 प्रकरणे नोंदवली. या प्रकरणांमध्ये 129 लोकांना अटक करण्यात आली आणि 60.16 कोटी रुपये किमतीचे 2,569 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.