Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट; 15 शहरांसाठी सुरू होणार उड्डाणं

Navi Mumbai Airport
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Navi Mumbai Airport। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्या दिवसापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) पासून १५ हून अधिक शहरांमध्ये दररोज १८ उड्डाणे होणार आहेत. देशातील भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी, इंडिगोने याबाबत पुढाकार घेतला आहे. इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) यांनी बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) पासून व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, हे विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईतील प्रवासी लोड थोड्या प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होणार आहे.

२०२५ पर्यंत उड्डाणाची संख्या ७९ पर्यंत जाईल- Navi Mumbai Airport

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या दिवसापासून 15 हून अधिक शहरांसाठी 18 दैनंदिन उड्डाणे (36 एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरू होणार आहेत. इंडिगोने सांगितले की नोव्हेंबर २०२५ पर्यंत उड्डाणाची संख्या ७९ पर्यंत जाईल. यामध्ये १४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश असेल. एवढच नव्हे तर मार्च २०२६ पर्यंत दररोज १०० पेक्षा जास्त उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होतील. ज्यामध्ये ३० आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील. फक्त इंडिगोच नव्हे तर येत्या काळात आणखी काही विमान कंपन्यांसोबत करार होण्याची शक्यता आहे.

इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स म्हणाले, नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे सुरू करणारी इंडिगो पहिली कंपनी असेल याचा आम्हाला आनंद आहे. हि पार्टनरशिप दोन्ही बाजूंनी पुढील पावले उचलण्यासाठी पूर्ण तयारी दर्शवते. प्रवाशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीला आणखी हातभार लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवी मुंबई विमानतळावरील नवीन उड्डाणांमुळे आमच्या ग्राहकांचा प्रवास अनुभव वाढेल आणि त्यांना परवडेल अशा किमतीत वेळेवर सेवा मिळेल असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, एनएमआयए हे नवी मुंबई येथील एक ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai Airport) आहे जे अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) ची उपकंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) यांच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे बांधले गेले आहे. ज्याचा बहुसंख्य हिस्सा ७४% आहे,तर महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असलेल्या सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको) कडे उर्वरित २६% वाटा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील विमानचालन क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीच्या मागणीला सामोरे जाईल आणि आर्थिक विकासाला चालना देईल.