नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. उधारीचे पैसे परत न दिल्यामुळे आरोपीने ठेकेदाराचा खून केला आहे. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमध्ये हि घटना घडली आहे. पाठीत स्क्रू ड्रायव्हरने वार करून हि हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीने आरोपीकडून 30 हजार रुपये उसने घेतले होते, मात्र ते परत न केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
नवी मुंबईत तुर्भे एमआयडीसी मधील शिशा साई प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. आरोपी जयशंकर प्रसाद याने ठेकेदार नंदकिशोर सहाणी याची पैशांच्या वादातून हत्या केली आहे. मृत ठेकेदार नंदकिशोर सहाणी याच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हरने वार करुन त्याचा जीव घेण्यात आला. मागच्या वर्षांपासून जयशंकर प्रसाद आणि नंदकिशोर सहाणी हे दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते.यावेळी ठेकेदार नंदकुमारने कामाला असलेल्या जयशंकर प्रसाद याच्याकडून तीस हजार रुपये उधार घेतले होते, मात्र त्याने पैसे परत न केल्याच्या रागातून हि हत्या करण्यात आली.
स्क्रू ड्रायव्हर पाठीत खुपसला
यामध्ये मृत नंदकिशोर सहाणी याने परत केल्यामुळे आरोपी जयशंकर प्रसाद आणि त्याच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात जयशंकर प्रसाद याने ठेकेदार नंदकुमार सहाणीच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला. हा वार एवढा भयंकर होता कि या हल्ल्यात नंदकुमारचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.




