नवी दिल्ली । पंजाबचे कैबिनेट मंत्री असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपले राजीनामा पत्र आज सोशल मिडिया वर जाहिर करत आपण या मंत्रिमंडळात काम करण्यास उत्सुक नाही आहोत याची पुन्हा आठवण करुन दिली आहे.
सदर मंत्रीपदाचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच तत्कालीन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे कडे सादर केला होता. आज त्यांनी मागील महिन्यात 10 जूनला सादर केलेले राजीनामा पत्र हे ट्वीटर वर जाहिर केले असून सदर पत्र हे मुख्यमंत्री यांना सुद्धा पाठविले आहे असे म्हटले आहे.
कैप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात सुरवातीपासून दोघांमध्ये अनेक पातळीवर कुरघोडी चालू होती. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मी फक्त एकाच कॅप्टनला मानतो ते म्हणजे ‘राहुल गांधी’ असे उत्तर देऊन कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या बद्दलचा दुरावा जगजाहिर केला होता.