हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका आहे नवनीत राणा यांच्या एका हितचिंतकाने याबाबत पत्राद्वारे त्यांना ही माहिती दिली आहे. काही संशयास्पद लोक तुमच्या मागावर आहेत. ते राजस्थानच्या सीमेवरून अमरावतीत आले आहेत. मी अल्लाहला प्रार्थना करेन की तुमच्यासोबत काहीही अनुचित प्रकार घडू नये. असं त्याने सदर पत्रात म्हंटल आहे.
काय आहे पत्रातील मजकूर-
नमस्कार मॅडम, मी तुम्हाला माझे नाव सांगू शकत नाही. मी तुमच्या शहरातील एक सामान्य नागरिक आहे. मी तुम्हाला चेतावणी देऊ इच्छितो की तुम्ही थोडे सावध रहा, कारण काही लोक तुमचा पाठलाग करत आहेत. तुम्ही मला अनेक गोष्टींमध्ये मदत केली आहे. मी सरकारी नोकर आहे. तुम्ही माझी बदली केली आणि माझ्या वडिलांना कोरोनामध्येही खूप मदत केली. मला तुम्हाला सांगायचे आहे की राजस्थान सीमेवरून काही संशयित लोक अमरावतीत आले आहेत. आणि मला ही माहिती मिळाली आहे की ते लोक तुमच्या घरीही आले आहेत. मी अल्लाहला प्रार्थना करेन की तुमच्यासोबत काहीही अनुचित प्रकार घडू नये. आणि अशाच प्रकारे तुम्ही सर्वोच्च पदावर जात राहू अशी प्रार्थना मी देवाकडे करेन … खुदा हाफीस…
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातून धमकी?
भाजपाच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याबद्दल अमरावतीत 21 जून रोजी उमेश कोल्हे या मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या व्यक्तीची हत्या झाली होती. त्यातील आरोपींना पोलिसांकडून अटकही करण्यात आली होती. मात्र पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. केंद्रीय तपास यंत्रणांकडून यासंबंधी चौकशी व्हावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली होती. तेव्हापासन त्यांना वारंवार धमक्या येत आहेत अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली होती.