अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांना जबर फटका बसला. त्यामुळे सोयाबीन सह कपाशी पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सांत्वना व दिलासा देण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या होत्या. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग सह भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली होती. मात्र नेमकी पिके काढणीला आली असता सततच्या पावसाचा फटका बसला पिकांना बसला.
जिल्ह्यात सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाते. मात्र या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पावसात भिजले त्यामुळे सोयाबीन काळपट पडले तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कुजले होते, त्यामुळे जिल्ह्यात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तातडीने नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.