नवनीत राणा यांनी घेतली ‘या’ भाषेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे कामकाज सध्या संसदेच्याकनिष्ठ सभगृहातसुरु आहे. आज सोमवारी सायंकाळी नवनीत राणा यांना मराठी मधून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्या शपथ घेण्यासाठी उभा राहिल्या तेव्हा सभागृहातील सदस्याने बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

नवनीत राणा यांनी शिवसेनेचे मुसद्दी नेते आनंदराव आडसूळ यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्या नंतर नवनीत राणा यांनी न थांबता पुढील निवडणुकीची तयारी केली. पाच वर्ष लोकांच्या कामावर भर दिल्याने नवनीत राणा यांना लोकांनी लोकसभेत जाण्याची संधी दिली आहे.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्यावर कडवी टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना अमरावतीतून संपण्याचे काम आनंदराव अडसूळ यांनी केले. या माणूस अमरावतीची नसून देखील तुम्ही त्यांना निवडून दिले आहे असे नवनीत राणा म्हणाल्या. तेव्हा त्यांच्या मागे लोकांनीं ठामपणे उभा राहण्याचे ठरवले. त्यानंतर आज नवनीत राणा यांनी आपल्याला मराठी माणसानी निवडून दिले आहे याची जाणीव ठेवून मराठीतून शपथ घेतली आहे.

Leave a Comment