हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानुसार, यंदा शारदीय नवरात्री ही 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी तब्बल 30 वर्षांनंतर जुळून आलेल्या चित्रा नक्षत्र, बुधादित्य आणि वैधृती तिन्ही शुभयोगात नवरात्रीला सुरुवात होत आहे. या योगातील शुभ मुहुर्तावरच घटस्थापना आणि पुजा करणे गरजेची आहे. त्यामुळेच आजच्या लेखात आपण घटस्थापनेचा आणि पूजेच्या शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेणार आहोत.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
यावर्षीच्या नवरात्रीची सुरुवातीस वर्षांनंतर जुळून आलेल्या शुभ योगात होत आहे. त्यामुळे घटस्थापनेसाठी 2 शुभ मुहूर्त चालून आले आहेत. हिंदू शास्त्रानुसार, यावर्षी घटस्थापनेसाठी शुभमुहूर्त आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.21 ते सकाळी 10.12 अशा काळात चालून आला आहे. या शुभ मुहूर्तावर आपण घटस्थापना करून माँ दुर्गा देवीची पूजा करू शकतो.
दुसरा शुभ मुहूर्त
त्याचबरोबर घटस्थापनेसाठी दुसरा शुभमुहूर्त हा आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीत सकाळी 11:44 ते 12:30 पर्यंतच आहे. या काळात घटस्थापना करून मातेची पूजा करू शकता. या दोन्ही शुभमुहूर्तांमध्ये आपण घटस्थापना करून माता दुर्गा देवीची पूजा करू शकतो. परंतु या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही मुहूर्तावर आपण घटस्थापना करू शकत नाही. तसे केल्यास आपल्याला केलेल्या पूजेचे देखील फलित मिळणार नाही.